दुपारची जेवणं झाल्यावर आई आणि बाबा वज्रासनात बसले होते आणि आम्ही उद्या त्याच्या Birthday च्या तयारी बद्दल बोलत होतो . अचानक खेळण्याचा विषय निघाला आणि आम्हाला आमचे लहानपणीचे दिवस आठवले ....
"काय खेळणी असायची तेव्हाची ....ते तारेवरच माकड - एक cycle चं स्पोक , स्प्रिंग आणि एक प्लास्टिक चं माकड, एवढेच raw material आणि ते माकड टक टक आवाज करत त्या तारेवरून खाली उतरायचं हा खेळ .....साधा simple तरी खूप मजा देणारा "....आई सांगत होती ....."आणि ते चक्र , ते नुसतं हातात घेऊन इकडून तिकडे धावत सुटायचो आम्ही , त्याच्यानी खेळण्यापेक्षा तेच आम्हाला खेळवायचं " मी म्हटलं ......"आम्ही त्याला भिरभिरं म्हणत असू , आणि आम्ही ते बनवायचो. एक कागद , एक काटा - बाभळीचा , बोरीचा किंवा मग जो मिळेल तो - नगर जिल्ह्यात काट्यांची कधी कमतरता भासली नाही आम्हाला , एक काठी - कधी बांबूची , कधी शिस्वाची नाहीतर आंब्याची नक्कीच मिळत असे ....सरळ काठी शोधण्यात जास्त वेळ जायचा , पण बऱ्याच वेळा आम्ही तिरक्या काठ्या चालवायचो , आणि एक लेंडी - ती शोधण्यासाठी आम्ही बोरीच्या झाडाखाली जायचो , तिकडे शेळ्या असायच्या आणि लेंड्याहि ...खूप सुकलेली लेंडी आणली तर ती काट्यात खोचल्यावर फुटायची आणि खूप ओली असेल तर हाताला चिकटायची म्हणून साधारण मध्यम सुकलेली अशी लेंडी शोधायची , ती शोधण्याचं प्रमाण म्हणजे बोरीच्या झाडाखाली जाऊन मध्यम दिसेल अशी लेंडी उचलून थोडी दाबून बघायची, ह्याच दरम्यान जर एखाद दोन बोरं मिळाली तर ती पण त्याच हातांनी बिनधास्त तोंडात टाकायचो " माझी इथे हसून हसून पुरेवाट झालेली ....मी नगर च्या राहुरी गावात तापलेल्या एका दुपारी बोरीच्या झाडाखाली परकर पोलकं नेसून शेळीच्या लेंड्या वेचणारी माझी आई आणि काल आदित्य साठी bisleri च्या पाण्यात ताक घुसळणारी माझी आई compare करत होतो .....आणि मग तीच आई मला उकिरड्यावर खेळताना बघून २२ -२३ वर्षापूर्वी ओरडलेली सुद्धा .....
"आणि हे सगळं साहित्य जमा करण्याचं काम आमच्याकडे असायचं म्हणजे माझ्याकडे आणि किशोर कडे(माझा मामा - आईचा सगळ्यात धाकटा भाऊ ) , मग त्याची assembly काही आम्हाला जमायची नाही , म्हणून ती अण्णा , जयंता वगरे करून दयायचे . त्यात सुद्धा काठी जर आंब्याची मिळाली किंवा जास्त सुकलेली मिळाली तर काटा जाताना तो तुटायचा म्हणून सगळ्या वस्तू दोन दोन आणायला आम्हाला आधीच सांगून ठेवलेलं असायचं " पटकन मला १२ -१५ वर्षांपूर्वी शालेय वर्षाच्या सुरुवातीलाच साधारण जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात २ पेन्सिल चे बॉक्स , २ खोडरबरांचे बॉक्स आणि १ शार्पनर चं बॉक्स घेणारी आई आठवली .........backup plans.......
आमची बालपणं पण अशीच गेली - भोवरा , गोटया , लगोरी आणि डब्बा ऐसपैस खेळण्यात .......अजूनही बऱ्याच वेळा मी जत्रेतून पिपाण्या आणि भोंगे , भिरभिरं किंवा तो जोकेरसारखा माणूस ज्याचे हात आणि पाय joints मधून वर खाली व्हायचे , किंवा ते गोल गोल फिरवण्याच अत्यंत irritating तर्रर्र्र टक तर्रर्र टक टक टक .....आवाज असणारं खेळणं वगरे सर्रास घरी घेऊन येतो ......ते घेताना , ते घेऊन येताना ट्रेन मध्ये , रिक्षात आणि अगदी बिल्डिंग मध्ये आणि लिफ्ट मध्ये मी असा दाखवतो कि जणू ते माझ्या घरी असणाऱ्या एखाद्या लहान बाळासाठीच आणलं आहे .....पण घरी येऊन त्या खेळण्याशी मनसोक्त खेळण्याची मजा काही औरच आहे ......
करून बघा कधी तुम्हीही ......तर्र्र्रर्र टक टक टक टक
No comments:
Post a Comment