Wednesday, September 5, 2012

तुझ्याविना ......



आणि  ती  वळून  दरवाज्यात  उभी  राहिली , क्षणभरच ...चेहऱ्यावर   थोडीशी  काळजी , कि  घाई , कि  थकवा ...कोणास  ठाऊक ...त्यानी  उठून  त्याचं  नेहमीचं  smile देण्याचा  प्रयत्न  केला , नेहमीएवढं    दिलखुलास  आलं  नाही , पण  पुरेसं ....ते  बघून  तिच्या  चेहऱ्यावरचे  भाव  झरझर  बदलले , मगाचच्या   काळजीची  जागा  एका  वेगळ्याच  expression नि  घेतली ...तिच्या  डोळ्यांची  ती  धार  आणि  चेहऱ्यावरची  स्मितरेषा ....दरवाज्यात  उभं  राहून  त्याच्या   एका  इशाऱ्याची  वाट  पाहणारी  ती ...त्याच्या  काळजात  एकदम  घुसून  गेला  तो  क्षण ..एखादा  Xray काढावा  तसा ...ती  तशीच  झपकन  निघून  गेली ...तरी  तिची  ती  नजर  त्याच्या  डोळ्यांना  खिळवून  ठेवून  होती ...तो  तसाच  बघत  राहिला , ती  नसलेल्या  त्या  बंद  दरवाज्याकडे ...

निमित्त  होतं  तिचं  काही  कामानिमित्त  बाहेर  जाण्याचं  आणि  म्हणून  त्याला  पुढचे  तब्बल  4 दिवस  भेटू  न  शकण्याच ...त्याला  खूप  काही  करायचं  होतं , बोलायचं  होतं ...पण  त्याच्यासमोर  उरला  होतां तो  एक  बंद  दरवाजा ...आणि  त्याच्या  अंतरातला  कल्लोळ  समजू  न  शकणाऱ्या अनभिज्ञ  लोकांची  गर्दी ...

त्याला  तर  ती  नेहमीच   आवडायची , पण  ती  थोडी  practical होती . वय , Finance, Family Background, Career, Caste काहीच  जुळण्यासारखं   नव्हतं  , पण  तरीही  तो  नेहमीच  तिच्या  वागण्या  बोलण्याचा , तिच्या  असण्याचा  दिवाना  होतां ..ती  थोडी  mature होती , त्याला  समजवायची . त्यालाही  सगळं  कळत  होतं , उमजत  होतं , पण  उमगत  मात्र  नव्हतं.

पण  आज ...आज  तिची  ती  नजर  काही  वेगळीच  वाटली , असं  वाटलं  जसं काही  तिलाही ....छे  छे , कसं  शक्य  आहे ? कालच  तर  आम्ही  तिच्या  लग्नाबद्दल  बोलत  होतो ...एक  विचित्र  आडनावाच   स्थळ  सांगून  आलं  होतं , आणि  मी  तिला  म्हटलेलं  "जर  तू  त्याच्याशी  लग्न  केलंस  तर  मी  पुन्हा  कधी  तुझ्याशी  chat  करणार  नाही ", त्याला  म्हणायचं  काही  वेगळंच  होतं ....मग  आज  सकाळी  कॅन्टीन  मध्ये  तिनी  चेष्टेनी  त्याला  दुसरं  एक  आडनाव  सांगून  'हे  चालेल  का ?' असं  विचारलंही  होतं ...आणि  अजूनही  ती  'त्याच्या ' प्रेमातून  पुरती ....

पण  मग  आज  अशी  वेगळी  का  दिसली  ती ...असं  वाटलं  जणू  तिलाही  माझा  हसरा  चेहरा  डोळे  भरून  पहायचा  होतं ..मनात  साठवून  घ्यायचा  होतं ....४  दिवस  पुरेल  एवढं ...हे  शक्य  आहे  का ? तिलाही  झाली  असेल  का  माझी  सवय ? तिलाही  हा  एकटेपणा  सलत  असेल  का ? तिलाही  मी  आवडत  ....मूर्ख  आहेस  तू , ती  तुझ्यापेक्षा  बरीच  जास्त  mature   आणि  practical   आहे  ..हा  सगळा  तुझ्या  मनाचा  खेळ  असेल ...

"Net Balance for the period for last year, should come using this formula, right?" he was startled by the question asked by his senior, he quickly gathered his thoughts, sat down and started explaining, "if we use this formula instead......."

उमजून  सारे  जरीही  खेळ  हा  मांडला , तरीही  कसा  सांगना  जीव-हा  गुंतला
झाले  आता  जरी , होते  जसे  मनी , का  हे  बदलले  अर्थ  सारे  सांगना
तुझ्याविना , तुझ्याविना ......